
मालवण : मालवण तालुका खरेदी विक्री संघ निवडणूकित १२५६ मतदान झाले आहे. सरासरी ४६ टक्के मतदान झाले आहे.मालवण टोपीवाला हायस्कुल मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे मतदान प्रकिया पार पडली. दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे ३ हजार मतदारांपैकी १००० मतदारांनी मतदान केले होते. मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १५ जागांसाठी रविवारी मालवण शहरातील टोपीवाला हायस्कुल मतदान केंद्रावर मतदान झाले. सुमारे ३ हजार मतदारांपैकी सुमारे १००० मतदारांनी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी दिली.
आज सकाळी ८ वाजता मतदानास सुरवात झाली असून ४ वाजेपर्यंत मतदान पार पडली. सायंकाळी मालवण तालुका खरेदी विक्री संघ इमारतीत मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी विकास पॅनेल तर महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेल उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सकाळ पासून मालवण मतदान केंद्रावर सर्वपक्षीय मोठी गर्दी होती. मतदारही उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावत होते. मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणा व पोलीस बंदोबस्त तैनात होता. शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती. थोड्याच वेळात होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ही निवडणूक भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत व जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी प्रतिष्ठेची केली आहे.तर आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक असून त्यांच्या साठी ही प्रतिष्ठेची मानली जाते....शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर हे वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक असून ते मैदानात उतरले आहे....