
वेंगुर्ला :
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मार्च २०२३ या अर्थसंकल्पीय बजेटमधून वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण मार्ग, राज्य महामार्ग, प्रादेशिक पर्यटन योजनासाठी २७ कोटी ३५ लाख तर संरक्षक भिंत, धूपप्रतिबंधक बंधारे यासाठी १७ कोटी असा एकूण ४४ कोटी ३५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितिन मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी शहरप्रमुख उमेश येरम उपस्थित होते. दीपक केसरकर यांनी मार्च २०२३ या अर्थसंकल्पीय बजेटमधून वेंगुर्ला-शिरोडा-सातार्डा रस्ता राज्य मार्ग मध्ये सातार्डा पुलाची दुरुस्ती करणे, वेंगुर्ला-शिरोडा-सातार्डा रस्ता राज्यमार्ग मध्ये वेतोबा मंदीर जवळ पूलाचे बांधकाम करणे, म्हापण-कोचरे-श्रीरामवाडी-कोचरे बंदर रस्ता राज्यमार्ग मध्ये भावई मंदीर शेजारी संरक्षक भितीचे बांधकाम करणे, वेंगुर्ला-मठ-बेळगाव रस्ता राज्य मार्ग मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे, वेंगुर्ला-शिरोडा-सातार्डा रस्ता राज्यमार्ग मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे, वेंगुर्ला- तुळस-सावंतवाडी रस्ता राज्यमार्ग मधील शहरी भागामध्ये काँक्रीटीकरण व रस्त्यांची सुधारणा करणे, परुळे-शेळपी -निवती रस्ता ग्रामीण मार्ग मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे, वेंगुर्ला-अणसुर-न्हैचिआड रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे, कोरजाई-आनंदवाडी-कर्ली रस्ता सुधारणा व डांबरीकरण, होडावडा शाळा नं. १ ते राऊतवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, केळुस-कालवी बंदर रस्ता सुधारणा व डांबरीकरण, कोचरा-चव्हाटा ते राऊळवाडी-आगारवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, दाभोली होळीचा खुंट ते दाभोली-मठ रस्ता सुधारणा व डांबरीकरण, मठ स्वयंभू सातेरी देऊळवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, उभादांडा-नमसवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, कोचरा चव्हाटा ते उंबराचेपाणी रस्ता सुधारणा डांबरीकरण करणे, भेंडमळा-रामघाट रस्ता सुधारणा व डांबरीकरण, म्हापण निवती रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे, आडेली दाभाडेवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, आडेली वजराट पिंपळाचे भरड ते वजराट देऊळवाडी रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे, वजराट चव्हाटा ते देवसू कांबळेवीर रस्त्यावर लहान पूलाचे बांधकाम करणे, मठ कणकेवाडी येथील कणकेश्वर मंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे, वेतोरे झाराप रस्ता सुधारणा व डांबरीकरण, पाल वादळवाडी खाजणादेवी शाळा रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे अशी ग्रामीण मार्गसाठी ५ कोटी १५ लाख, राज्य महामार्ग, इजिमा प्रजिमासाटी १९ कोटी २० लाख व प्रादेशिक पर्यटन योजनासाठी ३ कोटी मिळून एकुण २७ कोटी ३५ लाख रुपये अंदाजित कामे मंजूर करुन आणली आहेत.
याशिवाय वेंगुर्ला-सागरतिर्थ येथे संरक्षक भिंत बांधणे ७० लाख, रेडी यशवंतगड ते सिद्धेश्वर मंदिर येथील समुद्र किना-यालगत धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे ५ कोटी, शिरोडा वेळागर येथे समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे ५ कोटी, भोगवे किल्लेनिवती येथे धुपप्रतिबंधक, संरक्षक भिंत बंधारा बांधणे १ कोटी ७५ लाख, किल्लेनिवती येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे २ कोटी २४ लाख व केळुस येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणेसाठी २ कोटी १२ लाख रुपये असे एकूण १७ कोटी मंजूर करुन आणले असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितिन मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.