बीएस ६ दर्जाच्या ४ नवीन बसेस देवगड आगारात

Edited by:
Published on: March 25, 2025 19:20 PM
views 514  views

देवगड : बीएस ६ दर्जाच्या ४ नवीन बसेस देवगड आगारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे देवगड आगाराचा बस प्रश्न काही प्रमाणात सुटण्याच चिन्ह दिसत आहे. महाराष्ट्र बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गला या बसेस मिळण्यासाठी प्रयत्न केले होते.लवकरच आणखी सहा बसेस मिळणार असल्याने प्रवाशांची गैरसोय आता कमी होणार आहे.

देवगड आणि विजयदुर्ग आगारातून मोठ्या प्रमाणावर लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. विशेषतः देवगड आगारातून सर्वाधिक लांब पल्ल्याच्या फेऱ्या चालवल्या जातात, तर विजयदुर्ग आगारानेही रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे मार्गावर प्रवासी सेवा वाढवली आहे. तथापि, देवगड आगाराला सध्या अजून १५ नवीन बसेसची गरज आहे. या गाड्या मिळाल्यास आगाराचा कोलमडलेला कारभार सुधारेल, त्यामुळे उर्वरित सहा बसेस तातडीने मिळाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

तसेच,देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी पहाटे बंद झालेल्या पणजी-रत्नागिरी आणि उमरगा फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिली आहे.जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे देवगड आगाराला या गाड्यांसाठी पाठपुरावा केला आहे.