देवगड-जामसंडे नगरपंचायतीला शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून 4 कोटी 35 लाखांचा निधी

गटनेते शरद ठुकरूल, नगरसेविका प्रणाली माने, भाजप नगरसेवकांची माहिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 22, 2023 19:41 PM
views 273  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विकासकामांसाठी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून 4 कोटी 35 लाख निधी प्राप्त झाल्याची माहिती भाजपा नगरसेवकांकडून देण्यात आली. 

शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून व पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नगरोत्थानमधून देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी 4 कोटी 35 लाख रूपये निधी प्राप्त झाला असून यापुढेही राज्यात असलेल्या शिंदे फडणवीस शासनाच्या माध्यमातून नगरपंचायतीमध्ये नवनवीन प्रकल्प आणून विकासाची गंगा आणू, असा विश्वास भाजपा नगरपंचायत गटनेते शरद ठुकरूल व नगरसेविका प्रणाली माने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा शहर अध्यक्ष योगेश पाटकर, मिलींद माने, संजय तारकर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, रूचाली पाटकर,आद्या गुमास्ते, मनिषा जामसंडेकर, स्वरा कावले उपस्थित होत्या.

आमदार संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद ठुकरूल व प्रणाली माने यांनी ठाकरे सरकारच्या काळात विकासाची गती मंदावली होती, अशी टीका केली.  मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या काळात विकासाला चालना मिळाली असून आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विकासकामांसाठी 4 कोटी 35 लाख निधी प्राप्त झाला असल्याचे सांगीतले. याशिवाय अण्णाभाऊ साठे, सिंधुरत्न, नवीन न.पं.सहाय्यक योजना अशा विविध योजनांमधून न.पं.विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगीतले.