सावंतवाडी रेल्वे स्टेशन विकासकामांसाठी ‘रत्नसिंधू’मधून ३९ कोटी खर्चाच्या कामांचा आराखडा

Edited by:
Published on: February 14, 2025 11:10 AM
views 178  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरील विकासकामांसाठी ‘रत्नसिंधू’ योजनेतून सुमारे ३९ कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी रेल हॉटेल, नवे प्लॅटफॉर्म व छोट्या निवासी खोल्या उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री, आम.दीपक केसरकर यांनी दिली.

तसेच तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. रत्नसिंधू योजनेचा अध्यक्ष या नात्याने सावंतवाडी-मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. तसेच तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली. विकासकामांसाठी ‘रत्नसिंधू’ योजनेतून सुमारे ३९ कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी रेल हॉटेल, नवे प्लॅटफॉर्म व छोट्या निवासी खोल्या उभारण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब, रेल्वेचे अधिकारी जे. पी. प्रकाश, ए. बी. फुले, सूरज परब, सुनील परब, श्री. गाड, योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे उपस्थित होते.