वेंगुर्ले - वडखोल येथील ३० लाखाच्या विकास कामांचे भुमीपुजन

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर
Edited by:
Published on: January 07, 2025 18:30 PM
views 62  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील भालचंद्र पालव, विनायक पालव व कांता पालव यांच्या घराशेजारील संरक्षक कठडा बांधणे या एकूण ३० लाख रूपये किमतीच्या विकास कामाचे भुमीपुजन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते व शहर प्रमुख उमेश येरम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून झाले.

वेंगुर्ले शहरातील वडखोल येथे जाणारा रस्ता रुंदीकरण व त्याखाली असलेल्या घरांना संरक्षण होण्यासाठी बऱ्याच वर्षापासून येथील ग्रामस्थांची मागणी होती हि मागणी लक्षात घेऊन राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. यासाठी सचिन वालावलकर व उमेश येरम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या विकास कामाच्या भुमीपुजन प्रसंगी युवासेना शहर प्रमुख सागर गावडे, युवासेना पदाधिकारी संतोष परब, शाखा प्रमुख संजय परब, बाळा परब, राजू परब वहखोल ग्रामस्थ स्वप्नील परब, उत्तम परब, प्रथमेश सावंत, महेंद्र पालव, प्रसादह गावद्दे मनोहर पहते, समृध्दी परब, मयुरी परब, दिव्या पालव यांच्यासहीत वडखोल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, वडखोल येथील निशाण तलाव उंची वाढविण्याच्या प्रक्रियेत सतत पाठपुरावा केल्याने त्याला यश येऊन सुपूर्ण शहराचा पाणी प्रश्न संपुष्टात आला. यासाठी लागणाऱ्या जामिनी वडखोल वासियांनी त्यावेळी दिल्याने त्यांचे यात मोठे यागदान आहे. मात्र ज्या पध्दतीने या ग्रामस्थांना सवलती मिळायला हव्या होत्या, त्या मिळाल्या नाहीत याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार. तसेच जे निशाण तलावाचे पाणी आहे ते वडखोल येथील ग्रामस्थांना उपलब्द होत नाही, ते उपलब्द करून देण्यासाठी नियोजन मधुन प्राधान्याने पाठपुरावा करण्यात येईल व वडखोल वासियांचा पाणी प्रश्न सुध्दा संपुष्टात आणला जाईल. आगाची काळात विविध विकास कामांसाठी आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उमेश येरम यांनी, वडखोल भाग हा डोंगर उताराचा असल्याने व या ठिकाणी लोकवस्ती जास्त असल्याने विकास कामे करताना ग्रामस्थांचे सहकार्य महत्वाचे असते. या ठिकाणी वडखोल ग्रामस्थांची एकजूट असल्याने विकास कामे मार्गी लावणे सोपे होते. त्यामुळे पुढील काळात सुध्दा ग्रामस्थानी अशीच एकजुट टीकवून ठेवावी व विकासासाठी हातभार लावावा. जरी दिपक केसरकर यांचेकडे मंत्रीपद नसले तरी ते निधी देण्यास कमी पडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.

वडखोल येथे गणेश विसर्जन तळी संरक्षक भिंत, रस्त्याची कामे, पावसाळी गटारकामे, तलावातून वाहून जाणारे पाणी बागायतीला मिळण्यासाठी बंधारे, विद्युत वाहिनी दुरूस्ती व पोल बदलण्याची कामे अशी प्रकारे बरीच वर्षे प्रलंबित असलेली कोट्यावधी रूपयांची कामे दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करीत दिपक केसरकर यांचा जाहिर भव्य सत्कार करण्याचे निश्चीत करून याबाबत त्याचा तारीख व वेळ मिळण्यासाठी निवेदन शहर प्रमुख उमेश येरम यांचेकडे सुपूर्द केले.