
दोडामार्ग : एज्युमिट अकॅडमी (EduMeet Academy) च्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, नैतिक, भावनिक, सांस्कृतिक, सांख्यिकी, तार्किक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकासासाठी 'भारत टॅलेंट सर्च परीक्षा' BTS' या राज्यस्तरीय परिक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय यश संपादन केले आहे.
यामध्ये इयत्ता पाचवीतील कुमारी स्वानंदी महेंद्र मणेरीकर जिल्ह्यात 25 वी (राज्यात 228 वी), इयत्ता सहावीतील कुमारी वेदिका अजित कळणेकर जिल्ह्यात 6 वी ( राज्यात 95 वी ) , इयत्ता सातवीतील कुमारी आदिती संदीप सावंत जिल्ह्यात 16 वी ( राज्यात 277 वी ) अशा गुणाणुक्रमे उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष विकास भाई सावंत, उपाध्यक्ष डाॅ दिनेश नागवेकर, खजिनदार सी एल नाईक, सचिव व्ही बी नाईक, मुख्याध्यापक प्रल्हाद महादेव सावंत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ नाईक, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.