दोडामार्गात 3 ग्रामपंचायत झाल्या बिनविरोध

केर, विर्डी व मोर्ले गावांनी करून दाखविले
Edited by: संदीप देसाई
Published on: December 07, 2022 22:15 PM
views 286  views

दोडामार्ग : थेट सरपंच पदाच्या निवडणूक होत असतानाही दोडामार्ग तालुक्यात मोठा करिश्मा पाहायला मिळाला आहे. तालुक्यात एक नव्हे तर 3 ग्रामपंचायतच्या निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यात यापूर्वी पंचायतराज मध्ये लक्षवेधी काम केलेल्या  केर, विर्डी सह मोर्ले या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.  तर घोडगेवाडी मध्ये थेट सरपंच पद वगळता अन्य सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील २८ पैकी फक्त 25 ग्रामपंचायत च्या निवडणूकिसाठी मतदान होणार आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी तालुक्यातील २२ सरपंच पदाच्या तर ५८ सदस्य पदाच्या निवडणूक मधून उमेदवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता दोडामार्ग तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी मतदान होणार आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले. सरपंच पदासाठी असलेल्या ९५ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांनी तर सदस्य पदासाठी असलेल्या ३८६ उमेदवारांपैकी ५८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले. केर, मोर्ले व विर्डी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे उर्वरीत २५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७३ व सदस्य पदांसाठी ३२८ उमेदवारांत निवडणुक होणार आहे. यात अनेक दिग्गज आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. दरम्यान आंबडगाव मध्ये तर २ खुल्या जागा असूनही कुणी सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दखलच न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.