
सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्था ,संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे २८ वे वार्षिक स्नेहसंमेलन १८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशालेच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाले. एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर करत विद्यार्थ्यांनी हा सोहळ्याचा आनंद लुटला. या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परीषद सिंधुदुर्ग रत्नाकर धाकोरकर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष इम्तियाज खानापुरी, संस्थेचे उपाध्यक्ष. नासिर शेख, उपाध्यक्षा. निलोफर बेग ,सचिव हिदायतुल्ला खान, सहसचिव. सुलेमान बेग, सदस्य रिझवान पटेल , रफिक शेख, मुश्ताक बागवान , समीर बागवान, श्री परवेज बेग , श्रीम. अलिझा खान , खलील खान असे मान्यवर उपस्थित होते.
या वार्षिक स्नेहसंम्मेलनाप्रसंगी इन्सुली गावातील अस्सीसी संस्थेंच्या सिस्टर पेड्रीना आणि सिस्टर ब्रिजीट , युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश रमेश सुर्याजी व सदस्य, सामाजिक कार्यात सक्रीय असणारे मोहसीन रियाज मुल्ला यांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान शिक्षिका. शीतल मोरजकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.चालू शैक्षणिक वर्षात प्रशालेचे तालुका ,जिल्हा व विभागाला चमकदार कामगिरी करणारे खेळाडू , सर्वोत्कृष्ट स्पोर्टस् ग्रुप - रेड ग्रूप ,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थिनी कु . खुशी गवस या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला .प्राथमिक विभाग आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. सना नेसर्गी व माध्यमिक विभाग आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु . जीया शेख यांना प्रदान करण्यात आला . प्रशालेने आयोजित केलेल्या खाद्यमहोत्सव स्पर्धा २०२३ - २४ चे विद्यार्थी गटातील विजेता - इयत्ता नववी चा गृप व पालक गटातून विजेत्या श्रीम. प्रज्ञा परुळेकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी रत्नाकर धाकोरकर यांना संस्थेने राबवलेले उपक्रम बघून खूप समाधान वाटले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानात्मक विकासाबरोबर भावभावात्मक आणि क्रियात्मक विकास या तिन्ही अंगांचा विकास होतो ,तेव्हाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो . यासाठी ही संस्था व शाळा मनापासून मेहनत घेते ,हे इथे अनुभवायला मिळाले .विद्यार्थ्यांना माणूस बनवायचं काम शाळेच्या माध्यमातून ही संस्था करते ,असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले . तसेच सीस्टर पेड्रीना यांनी आपल्या असीसी संस्थेविषयी माहिती सांगितली व आपला सत्कार केल्याबद्दल बद्दल प्रशालेचे व संस्थेचे आभार मानले . तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश सूर्याजी यांनी तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले व आपल्या सत्काराविषयी आभार मानले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध बहारदार नृत्य , देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य , हॉरर डान्स ,बालनृत्याविष्कार , चार्ली चाप्लीन नृत्य , सामाजिक विषयवावर आधारीत संगीतनाट्य, प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले . मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली . या कार्यक्रमाला शिक्षक - पालक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी ,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरावरून भरभरून कौतुक होत आहे.