कुडाळ न.पं.ला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

आ.निलेश राणेंचे विशेष प्रयत्न
Edited by:
Published on: December 09, 2025 15:24 PM
views 254  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक यंत्रणा येथे उभारण्यासाठी मदत मिळणार आहे. 

कुडाळ नगरपंचायतीचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायतीने एमआयडीसी कडे यापूर्वी १८ गुंठे जमीन घेतली आहे. मात्र या प्रकल्पासाठी अजून २७ गुंठे जमिनीची आवश्यकता होती जेणेकरून हा प्रकल्प अधिक चांगल्या प्रकारे राबवता येऊ शकेल त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री बसवता येईल. यासाठी गेले काही महिने प्रयत्न सुरू होते. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जवळ आमदार निलेश राणे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. या अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे. पूर्वी १८ गुंठे आणि आता २७ गुंठे अशी ४५ गुंठे या प्रकल्पासाठी जागा एकाच ठिकाणी मिळाली आहे. आमदार निलेश राणे यांनी सांगितले आहे की हा प्रकल्प प्रदूषण आणि दुर्गंधी मुक्त केला जाणार आहे या अत्याधुनिक प्रकल्पांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे.