शिवसेना ठाकरे गटाचे २६ ला उपोषण | वैभववाडीतील 'या' समस्येविरोधात आक्रमक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 22, 2023 14:54 PM
views 378  views

वैभववाडी : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. रुग्णालय प्रशासनाविरोधात दि. २६ ऑक्टोबरला उपोषण छेडणार आहेत. याबाबतचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहे.

 तालुक्यातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी  महत्वाचे असणार ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.याविरोधात शिवसेना आक्रमक झालीं.रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ मिळावा, कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, सुसज्ज शस्त्रक्रिया सेंटर उपलब्ध करून द्यावे यासह रुग्णालय परिसरात स्वच्छता व पाण्याची सोय व्हावी या मागण्याकरिता उपोषण छेडले आहे.या मागण्या मान्य झाल्याखेरीज उपोषण स्थगित केले जाणार नाही असा इशारा लोके यांनी दिला आहे.