
कुडाळ : माणगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मला माणगावच्या जनतेने निवडून द्यावे. मी जर सरपंचपदी निवडून आले तर सत्ताधाऱ्यांनी गेल्या पंचवीस वर्षात जो भ्रष्टाचार केला, तो बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता घराणेशाहीला गाडण्याची हिच वेळ आहे, असे आवाहन करत आपल्याला नारळ निशाणी समोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन माणगाव ग्रामपंचायतच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत श्री देव यक्षिणी युवा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुंदरवल्ली कन्नुस्वामी पडीयाची व प्रभाग चार चे उमेदवार गोविंद उत्तम कुंभार यांनी केले आहे.सुंदरवल्ली कन्नुस्वामी पडीयाची यांनी पाचही प्रभागात जात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार केला.