ध्वजनिधीसाठी भालचंद्र जोशी यांच्याकडून 25 हजारांचा धनादेश

Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 02, 2024 18:01 PM
views 294  views

सिंधुदुर्गनगरी : तोंडवली मालवण येथील हॉटेल नित्यानंद प्राइड होम स्टेचे मालक भालचंद्र पांडुरंग जोशी  यांनी ध्वजदिन निधीसाठी 25 हजारांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश आज सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

समाजातील अशा दानशूर व्यक्तींनी देशासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.