दोडामार्ग तालुक्यासाठी मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून २३ कोटींचा निधी : गणेशप्रसाद गवस !

Edited by: संदीप देसाई
Published on: March 19, 2023 16:07 PM
views 125  views

दोडामार्ग : राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एकट्या दोडामार्ग तालुक्यासाठी एकाचवेळी तब्बल २३  कोटींचा निधी मंजूर करून घेत आपली ताकद दाखवून दिली आहे. यामुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक विकास कामे येत्या काळात वेगाने मार्गी लागणार असून दोडामार्ग तालुक्यांत ग्रामीण भागातील रस्ते व राज्य मार्ग सुसज्ज होणार आहेत.  शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी ही माहिती देत विरोधकांनी टीकाच करत बसण्यापेक्षा चांगल्याला चांगलं म्हणण्याचा चांगुलपणा दाखविला पाहिजे, अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खास अर्थसंकल्पात मंजूर कामांची यादी वाचत शालेय शिक्षणमंत्री तथा या भागाचे आमदार दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले आहेत. ग्रामीण मार्गांसाठी ३ कोटी ८२ लाख तर राज्य महामार्ग व इतर जिल्हा आणि प्रमुख जिल्हामार्ग यांसाठी १९ कोटी ३५ लाख अशी एकूण २३.१७ कोटींची कामे मंजूर झाली असल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांचेसमवेत उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, बाबाजी देसाई, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, आंबडगाव सरपंच स्नेहा गवस, अरुण नाईक, भगवान गवस आदी उपस्थित होते.

यावेळी गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार मंजूर कामे व त्यावर खर्च होणारा निधी पुढील प्रमाणे -

 साटेली भेडशी - बोडदे - मांगेली - कर्नाटक हद्दीकडे जाणाऱ्या रस्त्याला आवश्यक तेथे ठिकठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपये, साटेली भेडशी - पिकुळे रस्त्याला आवश्यक तिथे संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी ५० लाख रुपये, तिलारी - पाळये रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपये, झरे शेळपी बांबरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी ४० लाख रुपये, मांगेली - फणसवाडी - देऊळवाडी - कुसगेवाडी - खोक्रल रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी १० लाख रुपये,

माटणे - म्हावळुंगे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये, आयी - तळेखोल रस्त्यावरील फुलाला जोड रस्ता तयार करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, गिरोडे - झरेबांबर रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी ३० लाख रुपये, दोडामार्ग - आयी राज्यमार्ग ते आयी कुंभारवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी ३० लाख रुपये, कुडासे - भरपालवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, उगाडे कोळंबवाडी - तळकट देऊळवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये, कुंब्रल मुख्य रस्ता ते शिरवल रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, उसप शाळेचीवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, मोरगाव दलित वस्ती ते पवारवाडी ब्रह्मपुरी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये, घोटगे येळपयवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, तिलारी-पाळये रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, मेढे गावठाणवाडी नागनाथ मंदिर रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, घोडटगेवाडी खालची भटवाडी-कोनाळकट्टा रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी ३० लाख रुपये, सासोली-गोवा हद्द रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये, दोडामार्ग - वीजघर राज्यमार्ग ते आंबेली देऊळवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये असा भरघोस निधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. त्यामुळे भविष्यात दोडामार्ग तालुक्यातील सर्व रस्ते चकाचक होणार असल्याची माहिती गणेश प्रसाद गवस यांनी दिली.


मुख्यमंत्री ग्रामसडक (डीपीडीसी) योजनेतून -

मांगेली - फणसवाडी - कुसगेवाडी - देऊळवाडी रस्ता २.६ कोटी,  शिरंगे पुनर्वसन रस्ता ३.६ कोटी व २.४१ कोटी कुडासे - देवमळा रस्ता या तीन कामांना मंजुरी मिळाली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक (स्टेट फंड) योजनेतून - तेरवण मेढे रस्ता ८.८४ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.