
सावंतवाडी : शिवसेनेकडून नगराध्यक्षासाठी महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज शिवसेनेकडून २३ उमेदवार आपल नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
ॲड. सावंत- कविटरक यांच नाव माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केलं. आज शक्तिप्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. इच्छुकांची बैठक सुरू झाली असून थोड्याच वेळात निवडणूक कक्षात उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीवर अद्यापही दीपक केसरकर ठाम असल्याने युती झाल्यास कोणाचे पत्ते कट होणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.











