
वैभववाडी : तालुक्यातील हेत येथील केदारलिंग ग्रामदैवत मंदिरातील २१ घंटा चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार २५ जानेवारीला रात्री घडला आहे. याबाबत पुजारी अशोक वासुदेव गुरव यांनी पोलीसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.