काजू बीला २०० रुपये हमीभावाची मागणी..!

कोकणातील शेतकरी झाला आक्रमक | सरकारवर हल्लाबोल | तालुका स्तरावर धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद
Edited by: संदीप देसाई
Published on: February 16, 2024 12:48 PM
views 54  views

दोडामार्ग : कोकणात उदरनिर्वाहाचे प्रमुख पीक असलेला काजू बागायती व्यवसाय खर्च अधिक व उत्पादन कमी अशा परिस्थितीत काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आज काजू फळबागायत ठरली आहे. मात्र, या काजू उत्पादनाला ठोस हमीभाव नसल्याने कोकणातील लाखो शेतकरी अडचणीत सापडले आहे.

यात पार्श्वभूमीवर काजू बी ला प्रति किलो दोनशे रुपये हमीभाव मिळावा अशी जोरदार मागणी करत कोकणात शुक्रवारी काजू उत्पादक तथा फळ बागायतदार शेतकऱ्यांनी शासन दरबारी तालुका स्तरावर धरणे आंदोलन छेडत एकच हल्लाबोल केला. दोडामार्ग मध्ये तर काजू बी ला २०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणा देत काजू उत्पादकांनी आपल्या मागणीसाठी शासन दरबारी उठाव करत आंदोलन छेडल. 

शेकडोंच्या संख्येने काजू उत्पादक तथा फळबागायतदार शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दोडामार्ग येथील सिद्धिविनायक मंदिरात एकत्र येत आयोजक व काजू बागायतदार यांनी आंदोलनाची दिशा निश्चित केली त्यानंतर काजू उत्पादनाचा खर्च दापोली विद्यापीठाने 129 रुपये प्रति किलो सांगितला असला तरी स्वामीनाथन अहवाला प्रमाणे उत्पादन खर्च या दीडपट भाव म्हणजे प्रतिकूल 193 रुपये आणि वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना किमान दोनशे रुपये हमीभाव जाहीर करणे आवश्यक आहे ही बाब अधोरेखित केलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी पायी व दुचाकीने आपला मोर्चा तहसिलदार कार्यालये कार्यालयाकडे वळवी तहसीलदार कार्यालयासमोर आपल्या मागण्यांची जोरदार घोषणाबाजी केली.

त्यानंतर तहसील कार्यालयात दाखल होत आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सुपुत्र केले यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्याने काजू बागायतदार शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तर आजचा आंदोलन आहे केवळ सुरुवात होते या तमाम कोकणातील आंदोलकांची काजू बागायतदारांच्या आंदोलनाची सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर या पुढच्या आंदोलनाचा टप्पा अधिक तीव्र राहील असा इशारा सहभागाच्या शेतकरी संघाच्या वतीने देण्यात आला यावेळी शेतकरी व फळ बागायतदार संघाचे प्रवीण परब, अजित देसाई, चंद्रशेखर देसाई, डॉ. एम बी दळवी, मधुकर गावकर, अनिल मोरजकर,नारायण गावडे, विठोबा पालेकर, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, शशिकांत गवस, संजय गवस यांसह काजू उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.