
देवगड : 'अश्वमेध' करियर अकॅडमीच्या वतीने रविवार १९ नोव्हेंबर रोजी जामसंडे (देवगड) येथील श्रीराम गोगटे माध्यमिक विद्यामंदिर येथे एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस, भारतीय सैन्य तसेच सरळ सेवा आदी प्रशासकीय भरतीबाबत देवगडचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रामीण भागातील मुलांना शासकीय नोकऱ्या मिळाव्यात, या हेतूने अश्वमेध करियर अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विविध विभागातील भरती प्रक्रिया विचारात घेता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबाबत असलेला न्यूनगंड दूर करण्यासाठी हे शिबीर घेतले जात आहे. शिबिरात सरकारी भरती प्रक्रिया कशी असते, कोणकोणत्या संधी आहेत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, याविषयी तज्ज्ञ अभ्यासकांचे विचार ऐकायला मिळणार आहेत. या शिबिरात पालक सहभागी होऊ शकतात. आगाऊ नावनोंदणीसाठी इच्छुकांनी संस्थापक सिद्धेश आचरेकर (8275649254), मैदानी प्रशिक्षक अनिकेत पाटील, ओंकार धुरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.