
बांदा : गणेश उत्सवानिमित्त राजू भाई परब यांच्या निवासस्थानी 19 दिवस विराजमान श्री गणराया चरणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी रात्री 9.00 वाजता संयुक्त दशावातर नाट्य मंडळ सिंधुदुर्ग मधील नामांकित कलाकारांचा रथी सारथी संग्राम हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
तसेच रविवार दि 14 सप्टेंबरला गणपती विसर्जननिमित्त दुपारी 1.00 वाजता आरती होणार आहे. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी 5.00 वाजता बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजू भाई परब मित्रमंडळ बांदा खालची सटवाडी यांनी केले आहे.










