वैभववाडी रिक्षा संघटनेचा बुधवारी १८ वा वर्धापन दिन | विविध कार्यक्रमांचे आयोजन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 12, 2024 14:29 PM
views 117  views

वैभववाडी : वैभववाडी येथील रिक्षा संघटनेचा बुधवार ता. १४फेब्रुवारीला १८वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.सकाळी ११वाजल्यानंतर तीर्थ प्रसाद, त्यानंतर ११.३०न्यु यंगस्टार ढोल पथक तांबेवाडी यांचं ढोल वादन, दुपारी १ते३ महाप्रसाद,३ते५ महीलांची फुगडी, हळदीकुंकू समारंभ, रात्री ७ते९ बुवा संतोष कानडे यांचे चक्री भजन, रात्री बुवा सुजित परब विरुद्ध बुवा अखिलेश फाळके यांचा २०-२० डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे.भाविकांनी या कार्यक्रमांला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.