
दोडामार्ग : संपूर्ण दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत श्री ' पिंपळेश्वर ' चा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त देवस्थान समितीने ' छावा ' या भव्य नाट्यप्रयोगासोबत अन्य भरगच्च कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे. यंदाच्या वर्षी पिंपळेश्वराचा हा 18 वा वर्धापन दिन आहे.
बाजारपेठेतील श्री पिंपळेश्वर देवस्थानचा वर्धापन दिन यंदा देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता श्री पिंपळेश्वर अभिषेक, दहा वाजता अशी सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद चे आयोजन झाले आहे. सायंकाळी पाच वाजता संगीत स्वरधारा ग्रुपचा भजनाचा कार्यक्रम ( उद्योजक श्री. शैलेश दशरथ भोसले पुरस्कृत )संपन्न होणार आहे. तर रात्री आठ वाजता शिव छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला 'छावा 'हा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यसंपदा गोवा रचित हा नाट्यप्रयोग आहे. पिंपळेश्वर देवस्थान असलेल्या बाजारपेठेतील सर्व नागरिक. व्यापारी.. महिलावर्ग या सर्वांकडून वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सर्व कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर देवस्थान उत्सव समिती दोडामार्ग ने केले आहे.