सिंधुदुर्गला BSNLचे 156 नवीन टाॅवर मंजूर

विनायक राऊत यांची माहिती
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 22, 2023 19:49 PM
views 1096  views

कुडाळ : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्हीही जिल्ह्यात बीएसएनएलचे टाॅवर करण्यात यावे या करीता सातत्याने संसदेत आवाज उठविला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलचे 156 नवीन टाॅवर बीएसएनएलचे 156 नवीन टाॅवर मंजुर झाले असुन आठवडाभरात या टाॅवरची कामे सुरू होतील,  त्यामुळे आता जिल्हा कनेक्टीव्हीत सक्षम होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी दिली.

        जिल्हा दौर्यावर असलेले खास. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बीएसएनएलच्या अधिकार्यां च्या सोबत बैठक झाली.  या नंतर खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि प सदस्य नागेंद्र परब, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, तालुका संघटक बबन बोभाटे, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,  नगरसेवक उदय मांजरेकर,  नगरसेविका श्रृती वर्दम, श्रेया गवंडे, सई काळप, ज्योती जळवी हे उपस्थित होते. 

        यावेळी राऊत म्हणाले की, सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे दोन्हीही जिल्हे डोंगरी भागात येतात, या ठिकाणी दूरध्वनी यंत्रणा अडचण निर्माण होते, त्यामुळे येथील कनेक्टीव्टी यंत्रणा दर्जेदार व्हावी या करीता आवश्यक त्या ठिकाणी तसेच मच्छिमार यांना नेटवर्क मिळावे या करीता किनार पट्टी भागात बीएसएनएलचे टाॅवर व्हावेत या मागण्या सातत्याने  संसदेत केली. संबंधित मंत्री, बीएसएनएलचे सीजीएम यांचेशी बैठका केल्या.

         याच प्रकारे 5जी राहुदे पण, 4जी टाॅवर तरी द्या अशी मागणी अनेक खासदार करीत आहेत,  त्यामुळे अर्थमंत्री यांनी दखल घेत 25 हजार कोटी रूपयांची तरतुद प्रथमच केली, पण या विभागातील अधिकार्यानां व्हिआरएस घ्यायला लावले,  आता 8% कर्मचारी आहेत, बाकी खाजगीकरण केले आहे अशी खंत व्यक्त केली. 

        केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बीएसएनएलच्या 156 टाॅवरची मंजुरी मिळाली असुन त्याचे अधिसुचना दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली आहे. 500 दिवसात हे टाॅवर उभारणे गरजेचे आहे,  मात्र संपुर्ण देशात तीन ते चारच ठेकेदार आहेत, त्यामुळे ते पुर्ण कसे करतील हा प्रश्न आहे.

         सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार्या 156 टाॅवर साठी जिल्हाधिकारी ते सरपंच यांचे पर्यंत सर्व अधिकारी,  लोकप्रतिनिधी यांनी चांगले सहकार्य केले, आता 156 टाॅवर 90 % शासकीय जमिनीत करण्यात येणार आहेत. तसेच 16 गावात अजुन टाॅवर मंजुर होतील अशी माहिती राऊत यांनी दिली.