
सावंतवाडी : सावंतवाडी भटवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या पादुकांचा १३६ वा वर्धापन दिन शनिवार संपन्न झाला. रत्नागिरी येथील सुप्रसिध्द गायिका विनया विराज परब व नामवंत गायक हेमंत काशिनाथ देशमुख यांचा संगीत कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. त्यांच्या सुश्राव्य गायनानं रसिक मंत्रमुग्ध झाले.
श्री दत्त मंदिर, भटवाडी, सावंतवाडी येथे संगीतसेवेचा कार्यक्रम आयोजित केला होता. पं. सुधाकर करंदीकर, डॉ. हनुमंत बर्लि, विदुर्षी डॉ. अलका देव मारुलकरह्यांच्या शिष्या, रत्नागिरी येथील सुप्रसिध्द गायिका सौ. विनया विराज परब व वसंत ओक व देविदास दातार यांचे शिष्य नामवंत गायक हेमंत काशिनाथ देशमुख यांच्या अभंग, नाट्यगीत, भक्तीगीत रुपातील गायन मैफील सजली होती. रसिकांनी उदंड प्रतिसाद त्यांना दिला. या कार्यक्रमाला संवादिनी साथ निलेश मेस्त्री, तबला साथ किशोर सावंत यांनी तर निवेदन संजय कात्रे यांनी केल. श्री दत्त मंदीर येथे स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थितीती दर्शविली होती.