
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकूण १३ जणांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले सौरभ संदेश पारकर यांचाही समावेश आहे. १३ जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणुकीत 40 उमेदवार दिसणार आहेत यामध्ये नगराध्यक्षपदाचे तीन तर नगरसेवक पदाचे 37 उमेदवार असणार आहेत.
नगरसेवक पदासाठी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : प्रभाग 1. राजेश राणे, प्रभाग 2. रोहिणी पिळणकर, प्रभाग 3. शिवम राणे, प्रभाग 4. श्रेया पारकर, प्रभाग 7. सोनाली कसालकर, प्रभाग 8. किशोर कांबळे, विठ्ठल कासले, प्रभाग 12. साक्षी नेरकर, प्रभाग 15. सुप्रिया नाईक, प्राजक्त आळवे, प्रभाग 16. हिरेन कामतेकर, सोहम वाळके, प्रभाग 17. मयुरी नाईक.










