
वेंगुर्ले: पर्यावरण रक्षणाची जाणीव आणि मातृप्रेमाची भावना यांचा समन्वय साधणा-या ‘एक पेड माँ के नाम‘ या अनोख्या उपक्रमांतर्गत श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस येथे १२५ सुपारी आणि सोनचाफा यांची लागवड करण्यात आली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरविद नाईक यांनी झाडे उपलब्ध करुन सहकार्य केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मातेसमोर एक झाड लावून ते झाड तिच्या नावे समर्पित केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अदिती तांबोसकर, उपाध्यक्षा विभा आंगणे, मुख्याध्यापक प्रशांत हरमलकर, शिक्षिका लीना नाईक, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ज्ञ डॉ. सचिन परूळकर, गायत्री आरमारकर, अर्पिता नाईक, मुग्धा लिंगोजी, अक्षरा साळगावकर, माधुरी राऊळ, जान्हवी सावंत, योगिता गावडे, शिवानी सावंत, वैदेही राऊळ, दर्शना तुळसकर आदी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पालकांनीही श उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारली.