
सावंतवाडी : आरोंदा ज्युनिअर कॉलेजचा निकाल ८८.८८ टक्के एवढा लागला. यात राधिका देवाजी ७९.५५ टक्के गुणांसह प्रथम, प्रभाकर विर्नोडकर ६७.८३ टक्के द्वितीय तर दिव्या रेडकर ६७.५० टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे व शिक्षक वर्ग तसेच संस्था अध्यक्ष संदेश परब , सचिव भाई देऊलकर व संस्था कार्यकारिणी यांनी अभिनंदन केले आहे