
कुडाळ : घावनळे ग्रामपंचायत निवडणुक २०२२ च्या निवडणुकीत श्री रामेश्वर माऊली विकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ. सोनिया संतोष मुंज यांच्यासह अकराही सदस्य मोठ्या मताधिक्यानी विजयी होतील, असा दावा पॅनल प्रमुख संतोष मुंज यांनी केला आहे. कै. आबा मुंज यांनी गेल्या चाळीस वर्षात जी विकासाची गंगा घावनळेत आणली त्याला घावनळेची जनता साथ देवून सौ.सानिया मुंज यांना विजयी करेल.कै.आबा मुंज यांनी घावनळे गावासाठी जीवाचे रान केले होते. गावागावात अनेक विकासाची कामे केली. कै.आबा मुंज यांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर सौ.सानिया संतोष मुंज सहित अकरा सदस्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन करीत मतदार विरोधकांना धुळ चारतील, असा दावा संतोष मुंज यांनी केला आहे.
प्रभाग एक मधून हर्षदा रावजी धुरी, प्रमोद सुभाष घावनळकर,बाबली धर्माजी जाधव, प्रभाग दोन मधून नागेश महादेव सावंत, जयश्री जयराम पारकर, सरिता सदानंद मराठे, प्रभाग क्रमांक तीन मधून सुनिल चंद्रकांत खोचरे, रोहिणी जयवंत खोचरे, प्रभाग चारमधून माधवी मुरलीधर घावनळकर,शेखर महादेव सावंत, निकीत नंदकिशोर घाडीगावकर ह्यांना मोठ्या मताधिक्यानी विजयी करण्याचे आवाहन संतोष मुंज यांनी केले आहे.