जिल्ह्यासाठी 103 BSNL टॉवर मंजूर

केंद्रियमंत्री नारायण राणेंच्या मागणीला केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मंजुरी
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 13, 2023 17:28 PM
views 840  views

सिंधुदुर्ग : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 103 मोबाईल टॉवर पहिला टप्प्यात मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 110 मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. त्यातील 103 टॉवर हे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मागणी केलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.


केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना नोव्हेंबर महिन्यात पत्र दिले होते. या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता मोबाईल टॉवरची असलेली गरज लक्षात आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी मागणी केलेल्या 103 टॉवरला मंजुरी मिळालेली आहे. या टॉवरमध्ये

कणकवली तालुक्याील नाटळ, कासवण तळवडे, शिरवळ, नागवे ओसरगाव, आशिया, सातरल कासरल, कळसुली, शिवडाव, भरणी, आयनल, साकेडी, तरंदळे, शिवडाव, पियाळी, वरवडे, कासार्डे दाबाचीवाडी, शिडवणे, लोरे, करंजे. वेंगुर्ले तालुक्यातील पाल, रेडी, परुळे, कर्ली, रेवस, दाभोली, भोगवे, चिपी, वांयगणी, मोचेमांड, सागरतीर्थ, आरवली, सोनसुरे ,आसोली, अनसुर, खानोली, कोचरा, शिरोडा, केरवाडा, वजराट, मठ कानकेवाडी, आडेली, म्हापण, वेतोरे, वेंगुर्ले शहर.

वैभववाडी तालुक्यातीलकुं भवडे, नावळे, गडमट, हेत, वेंगसर.

सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कुंभारगाव, निरवडे, असनिये, दानोली, निगुडे, आरोस, आंबोली, न्हावेली. 

देवगड तालुक्यातील कोर्ले, देवगड रामेश्वर, मालेगाव, ओंबळ तोरसोले, दहिबाव, रेंबावली. 

कुडाळ तालुक्यातीलपोखरण, अनाव घोटगे, आवळेगाव, जांभवडे पावशी, बिबवणे. मालवण तालुक्यातील

देवली, कुमामे, कट्टा, कुणकवळे, नांदुरुख, पेंडुर-मोगरणे, आंबेरी-सडा, श्रावण,गोठणे – सावंतवाडी, पेंडूर, चाफेखोल, असगणी, वराड, हिर्लेवाडी, कातवड, कोळंब, न्हिवे, नांदोस, पळसम -डींगेवाडी, हेदुळ, कसाल, देवबाग, तळगाव-पडवे, मठ बुद्रुक, देवली.

दोडामार्ग तालुक्यातील घोटगे, साटेली भेडशी, पिकुळे, परमे, पंतुरली, वाझरे-गिरोडे, असे 103 बीएसएनएल टॉवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून मंजूर करून घेतले आहेत.