
सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमळे नं. ३ येथे सन २०२५-२६ चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी तसेच जि. प.चे विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार '१०० शाळा भेटी' उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं पुस्तकही भेट दिलं.
दरम्यान, शाळेच्या परिसरात एक पेड मा के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातारवण पहायला मिळालं. '१०० शाळा भेटी' उपक्रमांतर्गत ज्या शाळांना अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, त्या शाळा दत्तक घेऊन त्या शाळांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं तहसीलदार पाटील यांनी सांगितलं.