ए्लिमेंटरी परीक्षेत नेमळे विद्यालयाचा 100% निकाल..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 11, 2024 14:35 PM
views 170  views

सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ए्लिमेंटरी परीक्षेचा निकाल 100% लागला. नऊ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊन नवही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी पाच विद्यार्थ्यांना ब श्रेणी प्राप्त झाली. यात लोचन कोळगे,कोमल राऊळ,काजल हळदणकर,मिताली खोत,भार्गवी आळवे. तसेच इंटर मिजिएट परीक्षेत याच प्रशालेचा 88.23% निकाल लागला या परीक्षेला एकूण 17 विद्यार्थी प्रविष्ठ होऊन 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यात सानिका सत्यवान राऊळ या विद्यार्थी निने अ श्रेणी प्राप्त केली तर ब श्रेणी मध्ये आर्या कापडी, भार्गवी मांजरेकर,वैष्णवी राऊळ, हे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक एम. पी सारंग यांचे मार्गदर्शन लाभले.मार्गदर्शक शिक्षक व यशप्राप्त विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आ.भी. राऊळ प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.