
वैभववाडी : कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००टक्के लागला आहे. तालुक्यात प्रथम तीन क्रमांक या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. या विद्यालयातील २०७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.
विद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे
कला शाखा :
प्रथम क्रमांक - संचित मिलींद जाधव (७१.१७ टक्के), द्वितीय क्रमांक - प्राची दीपक पांचाळ (७०.३३ टक्के), तृतीय क्रमांक – प्रीती दयानंद गुरव (७०.१७ टक्के)
वाणीज्य शाखा :
प्रथम क्रमांक - संपदा यशवंत पुजारी (९३.४०टक्के), द्वितीय क्रमांक - श्रेया देवजी पालकर (९१.१७ टक्के), तृतीय क्रमांक- तनिष्का प्रशांत तावडे (८४.६७टक्के)
विज्ञान शाखा :
प्रथम क्रमांक- मानसी मुकुंद शिनगारे (८६ टक्के), द्वितीय क्रमांक - प्राची औंदुबर तळेकर (८४.१७ टक्के), तृतीय क्रमांक –साक्षी प्रवीण भोसले (८३.८३ टक्के)