
मालवण : नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्राफिकच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्रातून १० पथके दाखल झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीची व्यवस्था पाहिली जाणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले.
४ डिसेंबर नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी पेन पनवेल, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून दहा पथके दाखल झाली आहेत. यामध्ये एकूण ५९ अधिकारी ही ट्रॅफिकची व्यवस्था पाहणार आहेत. यामध्ये इतर जिल्ह्यातून २७ अधिकारी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ अधिकारी ही वाहन व्यवस्था मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटर निरीक्षक यांच्या साथीने पाहणार आहेत.
वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी तारकर्ली येथे ५ पथके, टोपीवाला हायस्कूल येथे १ पथक, राजकोट येथे २ पथके तर चिपी विमानतळ येथे २ पथके तैनात करण्यात आली आहेत. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली.










