
दापोली : शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली ता.चिपळूण येथील सुमारे दहा विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी यांची डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली.
नुकत्याच पार पडलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेमध्ये या सर्व विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले व कृषि विद्यापीठातील विविध कृषि विषय विभागांमध्ये आपला प्रवेश निश्चित केला व शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाची पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेमध्ये असणारी यशाची दैदीप्यमान परंपरा कायम राखली. यामध्ये कुमारी प्रणाली नलावडे ( कीटक शास्त्र विभाग), पवन यमगर ( उद्यानविदया विभाग), अभिजीत शिंदे ( वनस्पती शास्त्र) ,कुमारी आकांक्षा पाटील ( पशु शास्त्र विभाग), कुमारी सुरवी सैंदाने ( मृदा शास्त्र विभाग) ,कु. अभिषेक डिसले ( कृषि शास्त्र विभाग) ,कुमारी पुजा गायकवाड ( वनस्पती प्रजनन शास्त्र), कुमारी दीप्ती राणे ( कृषि विस्तार विभाग) , कु. अनिरुद्ध रांबाडे ( उद्यान विद्या विभाग) व कुमारी प्रज्ञा शिंदे ( वनस्पती रोगशास्र विभाग) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले आणी पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सखोल मार्गदर्शन लाभले.











