
दोडामार्ग : माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून उसप येथील रस्त्यासाठी 10 लाख रु मंजूर झाले असून तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. गेली अनेक वर्षे खड्डेमय झालेला उसप गावाचा रस्ता दुरुस्त करा अशी मागणी ग्रामस्त वारंवार करत होते त्या मागणीला अखेर यश आले असून माजी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसकर यांच्या आमदार निधीतून या रस्त्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाल्याचे शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी सांगितले आहे. मंजूर झालेल्या रस्त्याचे शिवसेनेच्या वतीने भूमिजन करण्यात आले. यावेळी मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, युवा तालुका प्रमुख भगवान गवस, उपतालुका प्रमुख दादा देसाई, उसप ग्रामस्त आदी उवस्तीत होते. यावेळी उपस्तित ग्रामस्थांनी दीपक केसकर व शिवसेनेचे आभार मानले.