BIG BREAKING ; कणकवली फोंडाघाटात 10 लाखाची रोकड जप्त !

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर SST पथकाची कारवाई
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 19, 2024 09:54 AM
views 1840  views

कणकवली : लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम, चार चाकी कार मधून जप्त केली आहे. ही कारवाई सकाळी 11:30 सुमारास करण्यात आली आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकीमध्ये 10 लाखाची रक्कम आढळून आली.  उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री तडवी यांनी पुढील कार्यवाही करता एसएसटी पथक प्रमुख यांच्या ताब्यात  दिली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे. यावेळी एसएसटी विभागाचे अधिकारी विश्वास राणे, श्री. बाणे, कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस हवालदार मंगेश बावदाने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथी हे उपस्थित होते. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. पोलीस व स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली. मात्र, ही एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली ? कोणी आणली ?  कुठे घेऊन जाण्यात येत होती ? याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.