वागदे सरपंचांकडून पुरग्रस्तांना 1 महिन्याचे मानधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 27, 2025 15:45 PM
views 206  views

कणकवली : मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार झालेला असताना मराठवाड्यातील अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. या आवाहनानुसार कणकवली तालुक्यातील वागदे गावचे सरपंच संदीप सावंत यांनी आपले सरपंच पदाचे एका महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना मदत म्हणून जमा केले आहे. 

राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून देखील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू असताना आपणही सरकारचा भाग म्हणून पूरग्रस्तांना ही मदत पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर दिल्याची माहिती सरपंच संदीप सावंत यांनी दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांनी देखील अशी मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन देखील श्री सावंत यांनी केले आहे.