सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ लाखाचं बक्षीस

अपूर्ण मनुष्यबळात कौतुकास्पद कामगिरी
Edited by:
Published on: February 10, 2025 16:56 PM
views 269  views

सावंतवाडी : अपुरे कर्मचारी असताना उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्याबद्दल सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायकल्प योजनेच्या माध्यमातून १ लाखाचे बक्षीस देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहे. तसेच काम करणाऱ्या कर्मचारी व डॉक्टरांचे त्यांनी कौतुक केले आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. गिरीशकुमार चौगुले यांनी दिली आहे. 

डॉ. चौगुले म्हणाले, १ एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाकडून तब्बल ७५ हजार बाह्य गुणांची तपासणी करण्यात आली. यात ६ हजार रुग्णांना अंतर्गत सेवा देण्यात आली. विशेष म्हणजे ४४३ मातांची नैसर्गिक प्रसूती झाली तर ४७५ मातांची शस्त्रक्रिया करून प्रसूती झाली. यात ६८१ जटिल शस्त्रक्रिया होत्या. ७७ रूगांची गॅस्ट्रोस्कॉपी करण्यात आली आहे. १६०२ गरोदर मातांची सोनोग्राफी करण्यात आली आहे. ३१६० रुपयांचे सिटीस्कॅन करण्यात आले आहे. तसेच ६ हजार ४१७ रुग्णांची एक्सरे करण्यात आले .१३ हजार ३११ लोकांनी रक्तदान केले.असंसर्गिक रोग विभाग अंतर्गत ६१२५ मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांना सेवा दिली आहे. तर ६४५ आभाकार्ड बनवून दिले आहे. १ हजार ५१० रुग्णांना डायलिसिस देण्यात आला. १७६ रुग्णांना महात्मा फुले आरोग्यदायी योजने अंतर्गत सेवा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.