
वैभववाडी : आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून वैभववाडी शहरात मंगळवार दि.२७ऑगस्ट ला दहीहंडी उत्सवाच आयोजन करण्यात आले आहे.शहरात १लाख ११हजार १११रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे.
या उत्सवाला खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आम.नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित राहणार आहेत. या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच रसिकांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्रा असणार आहे.तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व गोविंदा पथकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.