देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील सुबोध रामचंद्र होडावडेकर, वय 56 याच्याकडे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला जामसंडे तरवाडी येथे छापा टाकून सुमारे 1 कोटी रूपये किंमतीचा व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ती उलटी ताब्यात घेतला आहे. सुबोध रामचंद्र होडावडेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे तरवाडी येथे हा पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी तेथीलच ही कारवाई 30 सप्टेंबर रोजी रात्री 8.50 वा.सुमारास केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, जामसंडे तरवाडी येथील सुबोध होडावडेकर याच्याकडे व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक समीर भोसले, पो.उपनिरिक्षक शेळके, स.पो.उपनिरिक्षक कोयंडे, पोलिस हवालदार काळसेकर, जामदार, देसाई, पो.नाईक पालकर, तेली, महिला पो.हे.कॉ.गवस, पो.कॉ.आरमारकर, सरमळकर आदींनी सोमवारी 30 सप्टेंबर रोजी रात्री 8.50 वा.सुमारास जामसंडे तरवाडी येथे छापा टाकून सुबोध होडावडेकर यांनी लालसर गुलाबी रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलेले व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थाचे गोळे ताब्यात घेतले. हे किलो वजनाचे असून किंमत सुमारे एक कोटी रूपये आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ गैरकायदा, बिगरपरवाना विक्री करण्याचा उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी सुबोध होडावडेकर याच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39,42,43,44,48,51 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. व या विषयीचा अधिक तपासहे.कॉ.उदय शिरगावकर करीत आहेत.