
वेंगुर्ले : गेली अनेक वर्षे रखडलेल्या आरवली -सोन्सुरे- जोसोली-आसोली रस्त्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सुमारे १ कोटी ८४ लाखांचा निधी प्राप्त झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी (१३ ऑक्टोबर) शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आरवली- सोन्सुरे येथे शिवसैनिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तर आसोली येथे शिवसेना व भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. असोली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आसोली उपसरपंच संकेत धुरी, जेष्ठ पदाधिकारी सदानंद गावडे, नारायण राणे, ग्रा प सदस्य राकेश धुरी, नीता राणे, सोसायटी चेअरम विश्वनाथ धुरी, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, उपविभागप्रमुख संजय गावडे, नंदा घाडी, राजू गावडे, लाडू राणे, गौरेश गावडे, विश्वनाथ गावडे, नारायण शेटये, पप्या गावडे, पंकज कांबळी आदी उपस्थित होते.
तर आरवली सोन्सुरे येथे करण्यात आलेल्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना उपविभागप्रमुख शंकर कुडव, शाखाप्रमुख कृष्णा सावंत, अजित चिपकर, ग्रा प सदस्य अक्षता नाईक, सागर नाईक, चेतन गडेकर, ओंकार गडेकर, सचिन गडेकर, गुंडू गडेकर, समीर साळोस्कर, गौरव पेडणेकर, दामू चिपकर, नंदू चिपकर, बाळा पेडणेकर, बाळा मयेकर, धर्मा गडेकर, प्रल्हाद पेडणेकर, दत्ताराम गडेकर, विहान गडेकर, सिद्धेश गडेकर, गौरव गडेकर, ज्ञानेश्वर गडेकर, संजय गडेकर, अनुप मातोंडकर, अनिकेत मातोंडकर, संतोष मातोंडकर, गंगाराम मातोंडकर आदी उपस्थित होते.