
सावंतवाडी : जागा विकत घेण्याला माझा विरोध नाही. परंतु, १० रूपये द्यायचे अन १०० रूपयांवर सही घ्यायची हे चुकीचं आहे. मी हा लढा यापूर्वी देखील केलेला आहे. त्यामुळे असा लढा करणार की ती लोक पुन्हा जिल्ह्यात दिसणार नाहीत असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ते म्हणाले, मी टोकाला येईपर्यंत थांबतो. पण, एकदा टोकाला आलं की मग त्या लोकांना कशी जागा दाखावायची हे मला चांगलंच ठाऊक आहे. असा संघर्ष मी करतो तेव्हा संपूर्ण सिंधुदुर्गवासीय माझ्यामागे ठामपणे एकजुटीने उभी राहतात हा इतिहास आहे. तो इतिहास पुढेही दिसेल असं मत व्यक्त मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.