सुरभीच्या 'Unique And Multipurpose Farming' प्रतिकृतीला तृतीय क्रमांक

Edited by:
Published on: November 29, 2024 19:27 PM
views 173  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सावंतवाडी यांनी सैनिक स्कूल आंबोली येथे आयोजित केलेल्या ५२ व्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात माडखोल धवडकी शाळेच्या  कु . सुरभी मधुकर राऊळ - इ . ६ वी हिने सादर केलेल्या 'Unique And Multipurpose Farming' या विज्ञान प्रतिकृतीला सावंतवाडी तालुक्यात तृतीय क्रमांक मिळाला. या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे . पुन्हा एकदा एकूण ५१ स्पर्धकांमधून शाळेने हे घवघवीत यश मिळवले आहे .