नौसेना दिनासाठी कुडाळातून सुटणार 45 ST !

69 ग्रामपंचायतींसाठी व्यवस्था
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 02, 2023 12:23 PM
views 1800  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने बारा हजार नागरिकांच्या जाण्या येण्याच्या व्यवस्थेसाठी 45 एसटी बस शासनाच्या वतीने ग्रामपंचायतस्तरावर उपलब्ध करून देण्यात आल्यात. नौसेनादिनानिमित्त मालवण तालुक्यात होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर या व्यवस्थेमध्ये शासनाच्या वतीने सकाळच्या नाश्त्यासह दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कुडाळ तालुक्यातील एकूण 69 ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांसाठी ही व्यवस्था करण्यात आली असून काही ठिकाणी दोन गावांसाठी एका बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस नौसेना दिना दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायत समोर दाखल होणार असून दहा वाजेपर्यंत मालवणच्या दिशेने रवाना होणार आहेत. याबाबतची माहिती ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी दिली आहे. तरी या व्यवस्थेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, व चार डिसेंबर रोजी होणाऱ्या नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या आनंद सोहळा सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे