
कणकवली : कोकणी माणसाचा महत्वाचा सण असलेल्या गणेश चतुर्थीनिमित्त विविध शहरातून येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत करण्यासाठी कणकवली तालुका प्रवासी संघाच्यावतीने सोमवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वा. कणकवली रेल्वेस्थानक परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष प्रवासी संघ हा उपक्रम राबवित आहेत. या कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था सहभागी होणार असून शासकीय अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी केले आहे.