
वेंगुर्ले- आयडियल चेस अॅकॅडमी, वेंगुर्लातर्फे घेण्यात आलेल्या मुलामुलींच्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात सोहम देशमुख, १४ वर्षाखालील गटात चेतन भोगटे तर १० वर्षाखालील गटामध्ये समर्थ गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण १५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन टांककर शेटये ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन शेटये यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात प्रथम-सोह देशमुख, द्वितीय-विभव राऊळ, तृतीय-रूद्र मोबारकर, चतुर्थ-यथार्थ डांगी, पाचवा-मयुरेश परूळेकर, सहावा-मिनल सुलेभावी, सातवा-तनिष तेंडोलकर, आठवा-वरद तवटे, नववा-सौरभ धारगळकर तर दुर्वांक मलबारी याने दहावा क्रमांक पटकाविला. १४ वर्षाखालील गटात प्रथम-चेतन भोगटे, द्वितीय-गुणवंत पाटील, तृतीय-गार्गी सावंत, चतुर्थ-वेदांत भोसले तर हर्ष राऊळ याने पाचवा क्रमांक पटकाविला. १० वर्षाखालील गटात प्रथम-समर्थ गावडे, द्वितीय-विहान अस्पतवार, तृतीय-अन्वय सापळे, चतुर्थ-दुर्वांक कोचरेकर तर विघ्नेश आंबापूरकर याने पाचवा क्रमांक पटकाविला. कौस्तुभ पेडणेकर व श्री.आडेलकर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले.
बक्षिस वितरण जनार्दन शेटये, स्पर्धेचे आयोजक नागेश धारगळकर, कौस्तुभ पेडणेकर, श्री.आडेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री.धामापुरकर, श्री. भोगटे, श्री.तवटे, श्री.देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप प्रभू यांनी केले.