....तर राजन तेलींचे काम करणार !

रोष घारेंवर नाही : बाबुराव धुरी
Edited by: विनायक गांवस
Published on: October 16, 2024 07:41 AM
views 680  views

सावंतवाडी : शिवसेना ही संघटना आदेशावर चालते. पक्षप्रमुखांच आदेश मानून शिवसैनिक काम करतो. राजन तेली पक्षात आले तर स्वागतच आहे. त्यांच्याबाबतीतली भुमिका हे पक्षप्रमुख घेतील. संघटना मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. राजन तेली यांना संघटनेनं उमेदवारी दिली तर त्यांचे काम करणार अशी माहिती धुरी यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, अर्चना घारे-परब यांना तिकीट दिलं तरी आम्ही त्यांच काम करू, वरिष्ठ आदेश देतील तो मान्य असेल. आमचं अर्चना घारे-परब यांच्यावर रोष नाही. पण, हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांची भावना चुक म्हणू शकत नाही. तसेच महाविकास आघाडीतून सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला गेला असं पुढे येत आहे. मात्र, शिवसेनेसाठी आम्ही आग्रही आहोत. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडीचे नेते या संदर्भातील भुमिका जाहीर करतील. अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही काम करू व दीपक केसरकर यांचा पाडाव करु असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केले. यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, बाळू परब, अशोक परब आदी उपस्थित होते.