
सावंतवाडी : राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी शिव संस्कार अंतर्गत भव्य आंतरराज्यीय वेशभूषा स्पर्धा वेगवेगळ्या गटात व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात या चार राज्यांमध्ये संपन्न होणार आहे.
शिशुगट ३ ते ५ वर्ष, बाल गट ६ ते १० वर्ष, मोठा गट ११ ते १४ वर्ष आणि खुला गट १५ वर्षांपासून पुढे असणार आहे. सदर स्पर्धा ही ऑनलाइन स्वरूपाची असून यामधील व्हिडिओ वन टेक असला पाहिजे. तसेच वेळ मर्यादा दोन मिनिटांची असेल. हा व्हिडिओ लाईट किंवा म्युझिक यांचा आधार न घेता केलेला असावा. स्पर्धेमध्ये फक्त जिजाऊंचीच वेशभूषा करावयाची आहे.
स्पर्धेची एन्ट्री फी प्रत्येकी फक्त पन्नास रुपये आहे. ही फी संस्थेच्या क्यू आर कोड ला स्कॅन करून ऑनलाइन भरावयाची आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०२३ आहे. व्हिडिओ ९६०७८२७२९६
या नंबरवर पाठवावयाचा आहे . स्पर्धेचा निकाल दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केला जाईल.
प्रत्येक सहभागी कलाकाराला ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येईल.प्रत्येक गटातून पहिले तीन क्रमांक काढले जातील, हे नंबर आंतरराज्यीय असतील.
प्रथम द्वितीय आणि तृतीय या क्रमांकांना प्रमाणपत्र बाय पोस्ट पाठवण्यात येईल, प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला शिव संस्कार च्या वार्षिक भव्य सोहळ्यामध्ये विशेष अतिथींच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ यांचा इतिहास, स्वराज्य लढा, स्वधर्माभिमान अशा अनेक पैलूंचे दर्शन आजच्या पिढीला व्हावं, त्यांच्याबद्दलचं साहित्य वाचनात यावं, त्यांच्या विचारांचे मंथन व्हावं या उदात्त हेतूने मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिव संस्कार या उपक्रमांतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले आहे.तरी सदर स्पर्धेमध्ये तमाम माता भगिनींनी भाग घेऊन आपल्या आऊ साहेबांना जयंतीदिनी आदरांजली वाहावी, असे आवाहन शिव संस्काराच्यावतीने करण्यात येत आहे.
विशेषतः गृहिणींना आपल्यातील सुप्त कला गुण दर्शविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याचे काम शिव संस्कार करीत आहे. आपला जाज्वल्य इतिहास प्रत्येकाच्या मनामनामध्ये जागृत ठेवण्याचे कार्य शिव संस्कारने हाती घेतलेले आहे.
वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक ऐतिहासिक दिनविशेषी विविध माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून इतिहासाची ही ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा वसा शिव संस्कार ने घेतलेला आहे. सर्व शिवभक्तांना शिव संस्कार उपक्रमामध्ये सहभागी होण्याची नम्र विनंती पदाधिकाऱ्यांनी केली आहे. २४ जानेवारी २०२३ रोजी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे ही निबंध स्पर्धा खुल्या गटासाठी शहाजीराजेंच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात येणार आहे. याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याची
याची सर्वांनी नोंद घ्यावी. दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी राज्यभरात ठीक ठिकाणी पाचवी ते आठवी चा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवचरित्र ही शंभर मार्कांची लेखी परीक्षा पार पडत आहे. चार महिने अगोदर मुलांना शिवचरित्र वाचायला दिले जाते.
स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसंस्कार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनल लेले, कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, सौ उर्मिला राणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२३५३७२९६, ७६६६८६७१४४, ९६७३९३२२१९ या मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसंस्कार संस्थेचे कार्यकर्ते डॉ. सोनल लेले, गणेश ठाकूर,
सौ. अनिता महेश पाटील, सौ. अस्मिता अमोल कोळी, सौ. उर्मिला उमाजी राठी, सौ. प्रियांका भरत मेजारी, विनय रवीउदय वाडकर, प्रा.सुभाष गोवेकर, भरत गावडे, प्रा. रुपेश पाटील आदि प्रयत्न करत आहेत.
दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी शहाजीराजे पुण्यतिथीनिमित्त खुल्या गटासाठी 'स्वराज्य संकल्पक-शहाजीराजे' निबंध स्पर्धा व १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा होणार आहे.