
सावंतवाडी : पाचशे रुपये द्या 'गुगल पे' करतो असे सांगत एका मोबाईल ॲपद्वारे शहरातील व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला शहरातील व्यापाऱ्यानी शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित युवकाने गेल्या चार दिवसात शहरातील अनेकांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे यावेळी उघड झाले. ताब्यात घेतल्यानंतर संबंधित युवकाकडे रोख रक्कमही सापडली.