
सिंधुदुर्गनगरी : महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांची दिरंगाई, जमीन मोजणी विभागाचा मनमानी कारभार यामुळे सामान्य माणूस दबला गेला आहे. मात्र, मोठा धंनदांडगा ही सर्व या यंत्रणा वापरत आहे हे सासोली येथील प्रकरणावरून उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही. हे थांबले नाही तर त्या मोठ्या माणसाविरुद्ध मीच तक्रार करेन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवतो म्हणून तडीपार करेन असा दम पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दिला.
सासोली येथील गरीब माणसं आपल्या न्यायासाठी उपोषण करतात मात्र प्रशासन किंवा महसूल यंत्रणा भूमी अभिलेख अभिलेख यंत्रणा कांडोळा करत. एखादा मोठा माणूस येतो व ही सर्व शासकीय यंत्रणा वापरतो. त्याचे मात्र झटपट काम होते. तहसीलदार खानोलकर सारखा त्या मोठ्या व्यक्तीला एका दिवसात बिनशेती सनद देतो! ही अवस्था महसूल मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहे. तलाठी मंडल अधिकारी तहसीलदार सर्व एकाच माळेचे मणी आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कामे करताना या यंत्रणेचे हात कापतात व कामात दिरंगाई होते. मात्र मी हे खपवून घेणार नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस विभागावरील नाराजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आक्रमकते मध्ये दिसली. गरीब लोक विरोध करत आहेत. प्रकल्पसाठी लोकांचा विरोध नाही. फक्त नागरिकांच्या जमिनी मोजनी करून त्यांना द्याव्यात व त्या त्यांना मिळाव्यात ही साधी अपेक्षा आहे. मात्र गरीब जनतेचा विरोध असताना पोलीस बळाचा वापर करून मोजणी होते हे किती दुर्दैव आहे. तो मोठा माणूस जिल्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहे. मीच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करेन असा थेट दमही अधिकाऱ्यांना दिला. जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक पालकमंत्र्यांचे आक्रमकता बघून निरुत्तर झाले. संपूर्ण गावची मोजणी एकत्र करा जनतेची जमीन त्यांना मोजून द्या व त्या मोठ्या माणसाची जमीन त्याला द्या. मात्र या गरिबाला न्याय द्या हे काम तातडीने झाले नाही तर मी याची गंभीर दखल पुढे पण घेईन असा इशारा देताच भूमी अभिलेख निरीक्षक पुढे आले व तशी मोजणी करू अशी ग्वाही देत पालकमंत्र्यांची आक्रमकता शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा नियोजन समिती सभा सुरू होण्यापूर्वीच प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचा सर्वसामान्य नागरिकांसाठी झालेला संताप पत्रकारांच्या साक्षीने सर्वांनी अनुभवला.