
कुडाळ: कुडाळ शहरात नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. आज संध्याकाळी शहरात वेगाने धावणाऱ्या ४ डंपरवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
आठवडा बाजाराचे नियम धाब्यावर
कुडाळमध्ये आठवडा बाजाराच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असते. मात्र, हे नियम धाब्यावर बसवून काही अवजड वाहने शहरात भरधाव वेगाने धावत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
'या' टीमने केली कारवाई
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कुडाळ पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने मोहीम राबवली. या पथकात खालील पोलीस
* अमोल बंडगर (पोलीस हेड कॉन्स्टेबल)
* वेदिका गावडे (महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल)
* शर्मिला पाडगावकर (महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल)
* ज्योती रायशिरोडकर (पोलीस हेड कॉन्स्टेबल)
* मेघश्याम भगत (पोलीस हेड कॉन्स्टेबल) यांनी कारवाई केली आहे.










